अग्रदूत/डॉ.देवानंद आळंदी दि २४सप्टेंबर २०२५- येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा .डॉ.प्रभाकर घोडके मराठी विभाग प्रमुख एच.व्ही.महाविद्यालय पुणे, महाविद्यालय अधीक्षक प्रवीण भावे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ, रासेयो ग्रामीण समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजीव कांबळे,सहधिकारी प्रा.परमेश्वर भतासे,प्रा. सविता माणके, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा.माणिक कसाब,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.देवानंद गोरडवार, बीसीए विभाग प्रमुख प्रा.प्रफुल्ल जाधव, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रोहित कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिपाली ताम्हाणे आदी उपस्थित होते.

“राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर प्रा. डॉ. प्रभाकर घोडके बोलत होते .ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून काय प्राप्त करतो हे महत्त्वाचे आहे. रासेयोची स्थापना २४ सप्टेंबर १९६९ साली झाली त्यावेळी ३७ विद्यापीठ होती. २०२५ साली ६५७ आहेत.१९६९ साली ४०हजार विद्यार्थी होते तर २०२५ साली ७ कोटी ४०लाख विद्यार्थी आहेत.त्यामुळेच खऱ्या अर्थाने रासेयो समन्वयक हे समाजाचे खरे सदिच्छादूत आहेत असे म्हणाले.रासेयो विद्यार्थी निर्माण करणारी चळवळ असून रासेयोने पिंपरी चिंचवड महापालिकेत ५ महापौर.अनेक नगरसेवक दिले आहेत.रासेयो स्वयंसेवक दिल्ली येथे २६ जानेवारी पथसंचलनात सहभाग, उत्तम वक्ता , व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी निर्माण करते, ऊत्तम प्रशासन व्यवस्थापन करण्यासाठी रासेयो समाज व्यवस्थेतील सर्वात महत्वाची कार्यशाळा आहे .काम करण्यासाठी आकाश कमी पडेल,२४ तास योजनेशी जोडून, श्रमाचा संस्कार देणारी योजना यावर मौलिक मार्गदर्शन प्रा.डॉ.प्रभाकर घोडके यांनी केले .

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी आपले महाविद्यालयात २५० विद्यार्थी रासेयोत असून व्यक्तिमत्व संवर्धन करणारी रासेयो चळवळ आहे असे सांगितले.रासेयो ग्रामीण समन्वयक तथा अधिकारी प्रा. डॉ.संजीव कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावित करतांना म्हणाले की,व्यक्तिमत्वाला योग्य आकार देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत असते. तसेच वर्षभरात होणारे कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

सदर कार्यक्रमात, प्रा प्रभाकर गायकवाड, प्रा महेश म्हसागर,प्रा. यशोदा आनेराव, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. रुपाली औटी, प्रा. पूजा खेडकर , वरिष्ठ लिपिक वर्षा ताजने, नेहा लांडगे, सचिन गावडे, श्रीकांत कांबळे, वैभव बडवे, तसेच रासेयो स्वयंसेवक,बहुसंख्येने कला, वाणिज्य, बीसीए विभागातील विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे तर आभार प्रा. दिपक देवकर यांनी मानले.



